KAANMS ARTS, COMMERCE & SCIENCE COLLEGE Uncategorized महाविद्यालयात भूगोल दिन संपन्न २०२३

महाविद्यालयात भूगोल दिन संपन्न २०२३

सटाणा महाविद्यालयात भूगोल दिन साजरा 2023

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर आबासाहेब तथा ना.म.सोनवणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सटाणा, भूगोल विभागाच्या वतीने १६ जानेवारी २०२३ रोजी भूगोल दिन आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन  प्रमुख पाहुणे मा.डॉ.एन.बी बच्छाव व महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.विजय मेधणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ.पी.एस.कुदनर यांनी करताना   भूगोल दिनाचा हेतू व उद्देश स्पष्ट केला तर पाहुण्यांचा परिचय प्रा.डी.के.आहिरे  यांनी करून दिला.

कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते डॉ.एन.बी.बच्छाव यांनी आपल्या मनोगतातून भूगोल दिन  हा मकरसंक्रांतिच्या  दिवशी का साजरा केला जातो हे स्पष्ट करताना सूर्य मकर राशीत प्रवेश करतो हे त्याचे कारण आहे असे सांगितले व या दिवसा नंतर  हवामानात कशा प्रकारे बदल होत जातो याविषयी माहिती दिली. त्याच बरोबर त्यांनी भूगोल दिनाचे महत्व विशद करून भूगोल विषय स्पेशल घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली जिद्ध व चिकाटी ठेवली तर विविध क्षेत्रात रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात यावर माहिती देताना पर्यावरण,सर्वेक्षण,मोजणीशास्त्र,नकाशाशास्त्र,इ क्षेत्रात रोजगाराच्या  संधी उपलब्ध होऊ शकतात अशी  माहिती दिली.

कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय अध्यक्ष महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.विजय मेधणे यांनी अध्यक्षीय भाषणातून भूगोल दिनाचे महत्व सांगताना पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे मानवी जीवनातील महत्व विशद करून  पृथ्वीवर  येणाऱ्या आपत्तींना मानव कसा जबाबदार आहे.या विषयी माहिती देऊन  आपण पृथ्वीचे संवर्धन केले पाहिजे असे आवाहन  विद्यार्थ्यांना करण्यात आले.

या प्रसंगी भूगोल विभागाचे विद्यार्थी युवराज साळे व शुभांगी सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. त्याच बरोबर भूगोल दिनाचे औचित्य साधून भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रिकेचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन पवार तर आभार प्रदर्शन प्रा.वाय.बी.जाधव यांनी केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्सुर्फपणे सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय मेधणे यांचे बहुमूल्य  मार्गदर्शन लाभले.